तुझ्यावर जीवच जडला
तुझ्यावर जीवच जडला
औक्षणाचे औचीत्य
साधून तुझ्यावर
माझा जीवच ओवाळीला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
दृष्ट काढण्याचे अवसान
करून माझ्याच नजरा
मी तुझ्यावरून उतरविल्या
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
प्रीतीच्या देव्हार्यात
देव कसा भेटला
दर्शनाचे निमित्त करून
हृदयात तुला अर्चिला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
आहेसच तू असा
निर्मल कोमल
प्रेमाळ मधातला
माझ्या सानंदातला
माझाच मला हेवा वाटला
का म्हणून काय विचारतोस
तुझ्यावर जीव नाही का जडला ??
तुझ्यावर जीवच जडला
औक्षणाचे औचीत्य
साधून तुझ्यावर
माझा जीवच ओवाळीला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
दृष्ट काढण्याचे अवसान
करून माझ्याच नजरा
मी तुझ्यावरून उतरविल्या
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
प्रीतीच्या देव्हार्यात
देव कसा भेटला
दर्शनाचे निमित्त करून
हृदयात तुला अर्चिला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला
आहेसच तू असा
निर्मल कोमल
प्रेमाळ मधातला
माझ्या सानंदातला
माझाच मला हेवा वाटला
का म्हणून काय विचारतोस
तुझ्यावर जीव नाही का जडला ??
No comments:
Post a Comment