पहाट झाली...
पलंगावर कूस बदलून झाली
तिच्यावर अर्धी कविता रचून झाली
पण ती नाही आली ...
सकाळ झाली...
पेपरावर ओझरती नजर फिरवून झाली
चहाची पांचट गुळणी पिऊन झाली
पण ती नाही आली ...
दुपार झाली...
घरातली एकुणेक जागा पायांनी मोजून झाली
टि. व्ही. वरची सारी चैनल्स लागोलाग बदलून झाली
पण ती नाही आली ...
सांज झाली...
थंडीची रजई अंगावर लपेटून झाली
वाफेने काचेवर तिची आकृती बनवून झाली
पण ती नाही आली ...
आता मात्र, झाली रात्र
ती आलीच नाही, तीळमात्र....
तुझ्या आठवणीची वाट
बघता बघता....
आता येईल, मग येईल
करता करता....
चार प्रहरं निघून गेली.....
पण....
पण....
पण....
तुझी आठवण नाही आली...........
No comments:
Post a Comment