NiKi

NiKi

Wednesday, May 16, 2012

तुझी आठवण आधी यायची मागे मागे
आज पुढेच पळत आली
कदाचित मी आज कुठे रमणार
हे तिला कळले असावे

एक प्रदीर्घ प्रवास पूर्ण करून
ती बसली माझ्या प्रतीक्षेत
कंटाळून कलंडली ही जरा
जरा जास्तच उशीर झालं मला
मग कूस बदलून पहुडली ही

पाझरणारे डोळे पेटवून माझी
वाट बघत बसलेली ती
मी आल्यावर, पाहुण्या घरी
माझीच सरबराई करू लागली

No comments:

Post a Comment