असं म्हणतात,
आठवणींना भाषा नसते
त्या हळूच येतात
गत स्मृतींच्या
तरल पडद्या मागून
आणि तुम्हाला
तुमच्या संवेदनांसहित
अलगद......तुमच्या नकळत
उचलून घेऊन जातात
पण माझ्या बाबतीत मात्र
उलटे आहे.
.
आठवणी येऊन,
बसून माझ्या मांडीवर
मला सांगत बसतात
तुझ्या गुज गोष्टी
No comments:
Post a Comment