असो चंद्रप्रकाश, कधी अंधार सारा
असो सावली, कधी उन्हाचा पसारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा
असो मी एकटा, कधी सोबती दुसरा
असो वाट पाहत, कधी स्वप्न साजरा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा
असो क्षण सुखाचा, कधी दुख: बोचरा
असो बेचिराख मी, कधी आसमंत सारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा
No comments:
Post a Comment