रुसू नकोस माझ्यावर
दूर तुझ्यापासून असते
कारण तू माझ्या मनी
अन् मी तुझ्या मनी वसते
अबोल माझी प्रीती तुझ्यावर
मनात तुझ्याशीच बोलत असते
मनाला छळणारे प्रश्न
मनातल्या मनात तुलाच पुसते
प्रेम करतोस हसऱ्या मम चेहऱ्यावर
हसताना अवघडलेली असते
संवाद असतो मनात
तुझ्याच विनोदावर मी हसते
मनातल्या आपल्या प्रेमावर
तुझेच प्रेमगीत गात असते
तू मी आणि आपले प्रेम
स्वप्नातील त्या गावी दिसते
मिळेल सर्वकाही श्रद्धा देवावर
प्रेमाची ताकत मोठी असते
का आभाळ भरून आले कि
मन माझे मयूर बनून नाचते?
No comments:
Post a Comment