नयनांचा हा रम्य पिसारा झुलता वाटे
मोहाचा खेळ सारा करामत होई कधी
जुळती हृदयाच्या तारा तर कधी शोधसे
क्षणभराचा निवारा रंग हे नवखे
मना भुरळ घाली जणू इंद्रजाल
हे क्षणात उमले नि क्षणात नाहीसे
होई दुनियेत या पाऊल ठेवता मन
जणू वाऱ्यावर पाचोळा पाचोळा
राधेसमवेत रमलेला तो मुग्ध रघुनंदन सावळा
No comments:
Post a Comment