प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?
प्रिये तुजवीण राहू कसा ?
प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?
येई संध्या तीच दिवाणी
नसे तुझी छटाही राणी
रेतीत पाऊलखुणा तुझ्या कश्या ?
प्रीतीचे गीत मी ..........................
नसती सूर्य, चंद्र, तारे
उदास गाणे गाती वारे
मनातल्या लाटांना थोपवू कसा ?
प्रीतीचे गीत मी .........................
वाहू लागले ,ग , पहाट वारे
गंध न तुझे ,न,तुझे इशारे
स्वप्नात सखे ,असा जगू कसा ?
प्रीतीचे गीत मी .......................
No comments:
Post a Comment