NiKi

NiKi

Friday, May 18, 2012



लळा हा लागला जिवा

मैत्रीचं अतुट नातं हे अपुलं
दोघांनीही सहज जपलं

कधी रडू तर कधी हसू
हास्यासहीत हे पुसले आसू

रोज माझा तुला, किंवा तुझा मला
एक तरी एसएमस नक्कीच आला

येणारा एसएमस हा तुझाच असतो
चुकून कधी तरी दुसऱ्याचा असतो

मैत्री ही अपुली थोडी खास
इतरांना कदाचीत होतो त्रास

खरं सागुं, मला तुझ्या मैत्रीचा लळा लागलायं
मैत्री मैत्री म्हणता, तुझ्यात माझा जीव गुंतलाय

सकाळी उठलो तरी तुझाच चेहरा
रात्री झोपलो तरी तुझाच चेहरा

वाटलं नव्हतं तुझ्या भोवती इतका गुंतेण
रेशमाच्या किड्याचा तंतू बनून

कळंत नाही मनाला गं माझ्या
का लागली आस संगतीची तुझ्या

ठाऊक आहेत बंधनं तुझी नी माझी
तरी सुद्धा लळा लागला हा जिवा

लळा हा लागला जिवा

No comments:

Post a Comment