NiKi

NiKi

Tuesday, May 22, 2012



आज तू येणार नाहीस
आज.. आज जसा सूर्य उगवणारच नाही
आज.. आज पक्षांची किलबिल नकोशी वाटणार
आज.. आज फक्त असणार.. वाट पाहणं.. निरर्थक असं
माहित असूनही तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसणं..
आज.. आज तुझी किंमत नव्याने कळणार..
आधीचीच लाखमोलाची तू..
आज.. आज तू अनमोल होणार..
तुझ्या चाहुलींना आज कशाचीच तुलना नसणार..
तुझं न येणं .. आणि माझं झुरणं..
हे दिवसभर चालणार..
हे असं दिवसभर असणार...

No comments:

Post a Comment