NiKi

NiKi

Thursday, May 31, 2012

तुला पाहते मी


तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

No comments:

Post a Comment