NiKi

NiKi

Tuesday, May 15, 2012



माझे हे जीवन कुठे तरी अडकल्यासारखे वाटते
सोबत सगळेजण असतानाही कुणाची तरी कमीसारखी वाटते
क्षणाला क्षणाला आठवण येते तिची तेव्हा तिच्याशी खूप बोलावेसे वाटते
तिच्याशी बोलताना मात्र तिच्यातच हरवून जाण्यासारखे वाटते
मनातील सर्व तिला सांगावेसे वाटते
सांगितल्यावर कदाचित तिचा मन दुखावेल म्हणून हेच मन घाबरते
मग ह्या घाबरलेल्या मनाला परत मागे घ्यावेसे वाटते
पण हे वेडे मन माझे असून माझ्यापेक्षा तिच्याकडेच जास्त धावते
आता कोण समजावेल ह्या वेड्या मनाला त्याचे तरी काय चुकते
तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घेण्यास तर खूप वाटते
पण कळत नाही हेच जाणून घ्याचे का राहून जाते
आता एक क्षण पण राहवत नाही तिच्याशिवाय
हेच तर तिला सांगावेसे वाटते
पण मी सांगण्याच्याआधीच तिला हे कळावे असे मनापासून वाटते
आज नाही तर उद्या तिला कळेलच याची मला खात्री आहे
या खात्रीची जाणीव तिला असावी अशी ही एक चुणूक मनाला लागते
टाईमपास म्हणून नाही तर अगदी मनापासून खरं प्रेम केलं तिच्यावर
खरच माझ्या प्रेमाची कदर असेल तिला ही जर
तर आता फक्त मनापासून गोड हसावे तिने असे मनापासून वाटते
माझ्या आयुष्याच्या नात्याची गाठ तिच्या बरोबरच बांधावीशी वाटते
पण तिला ही हे मंजूर आहे असं तिच्या तोंडून एकदा ऐकावेसे वाटते
माझे हे जीवन कुठे तरी अडकल्यासारखे वाटते
आता मला कळले की सोबत सगळेजण असतानाही तिचीच कमीसारखी वाटते

No comments:

Post a Comment