आठवण येते जेव्हा तुझी...
नयन भरुनी येते,
स्वप्न विणलेले सोबतीचे
सारेच विसरुणी जाती...
आठवण येते जेव्ह तुझी...
मन वेडेपीसे होतं,
दुःखाबरोबर सुखाचे क्षण ही
आठवणीत येऊन दुःखच देतं...
आठवण येते जेव्हा तुझी...
मन मनात राहत नाही,
कितीही प्रयत्न केले तरिही
काहूर शांतच राहत नाही..
आठवण येते जेव्हा तुझी...
मन मलाच सांगुन पाही,
तुझ्याविणा जगणे माझे
जगणेच नाही...
आठवण येते जेव्हा तुझी...
मन ओंसडून वाही,
तुझ्या आठवणीँचा झरा
मनात वाहतच राही....
मनात वाहतच राही.....
No comments:
Post a Comment