NiKi

NiKi

Wednesday, May 16, 2012


तिच्या माझ्या प्रेमाला
तोड नाही कशाची
कीतीही चमकला इंद्रधनू तरी
सर नाही त्याला तिच्या नखाची
वसंत ही बहरत असेल
पण तिच्या सारखी तीच
केसात माळत नाही फुल कधी
पण बहरलेली तीच
श्रावण कधी आला कधी गेला
हे मला कळतच नाही
कधी हसते कधी रुसते
मी मात्र तिच्या शिवाय
कुणाला वळून पाहत नाही
तीच माझी दुनिया
परीघ प्रेम वर्तुळाचा
चैत्र… वैशाख तीच माझा
ऋतू प्रेम पावसाचा

No comments:

Post a Comment