NiKi

NiKi

Monday, May 28, 2012

तुझ्या माझ्यात


तुझ्या माझ्यात
प्रेमाचा स्पर्श
मनाचा हर्ष


तुझ्या माझ्यात
एकमेकांचे भास
मिलनाची आस


तुझ्या माझ्यात
स्वप्नांचे दिवे
रोजच नवे


तुझ्या माझ्यात
अबोली फुलली
लाली मम गाली


तुझ्या माझ्यात
नजरेचे धुंद खेळ
व्यापून सर्व वेळ


तुझ्या माझ्यात
हास्याचे ओघळणे
नदीचे खळखळणे


तुझ्या माझ्यात
हळुवार वेदना
गोड संवेदना


तुझ्या माझ्यात
क्षणाचा दुरावा
जन्मात न यावा


तुझ्या माझ्यात
किती या भावना
आभाळात मावेना


तुझ्या माझ्यात
रोज बहरणारे प्रेम
नित्याचाच नेम!

No comments:

Post a Comment