मनी रुंजी घालत विचार तुझे…
ह्रुदयी अनामक काहूर उठे,
डोळे मिटता मी मज पुसे…
तुच समोर की स्वप्न भासे!
अधरांवर टेकता अधरं तुझे…
मी ही हरले, मी ही विरले,
जाणता अजाणता…
तुझ्यासवे विसावले,
दचकून उठता ध्यानी आले…
स्वप्नसृष्टीत होते रमले!
मनी रुंजी घालत विचार तुझे…
ओठांवर अलगद स्मित फुले,
गालांवर फिरती मोर पिसे,
वेडावून मजला मनं हसे!
No comments:
Post a Comment