डंखता ते ओठ ओठी
मी गुलाबी न्हाहतो
पाहतो मग, पाहतो जे
ते गुलाबी पाहतो
तू अशी अन मोगरा हा
आग गंधित लावतो
धावतो मग देह माझा
रिक्त होण्या धावतो
धुंदते लावण्य जेंव्हा
स्वर्ग देही पाहतो
दाहतो मग ओठ होउन
देह माझा दाहतो
तो शहारा तृप्त अन
अतृप्त मी का वागतो?
मागतो मग मी पहाटे
तो शहारा मागतो
धुंदीचा हा दंश ताजा
नित्य हृदयी वाहतो
राहतो तूझ्यात काही
अंश माझा राहतो
No comments:
Post a Comment