NiKi

NiKi

Tuesday, May 15, 2012



एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकते

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेन पण मी ही तुझ्यासंगे येऊ शकते



एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देते की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये..............
कदाचीत मलाच तुझी गरज असेल ...........

No comments:

Post a Comment