माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
तुझ्याशिवाय अपूर्ण मी
तुजसवे परिपूर्ण मी
आकाशीच्या चंद्रासारखा
का असा दूर तू
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
तुझ्याशिवाय सुखही नकोसे
तुजसवे दु:खही हासे
जवळ असतोस मृगजळासारखा
का असा दूर तू
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
तुझ्याशिवाय शब्दही अपुरे
तुजसवे मन कवितेने भरे
भासतोस एका आनंदी गीतासारखा
का असा दूर तू
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
तुझ्याशिवाय गुलाबही गंधहीन
तुजसवे हरेक फुल जाते सुगंधून
फुलतोस का मी झोपल्यावर रातरानिसारखा
का असा दूर तू
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
तुझ्याशिवाय जगते मी अर्थहीन
तुजसवे सुखावते माझे जीवन
वागतोस मनमौजी वाऱ्यासारखा
का असा दूर तू
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
येशील न होवून चंद्र पौर्णिमेचा
बरसशील न होवून पाऊस वळीवाचा
फूलशील न होवून कमळ कायमचा
राहशील न होवून प्रियकर जीवनभराचा
कारण
माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू
No comments:
Post a Comment