NiKi

NiKi

Tuesday, May 1, 2012





इवल्या इवल्या फांदीवरती रातराणी डोलत असते
शब्दाविना मनाशीच खूप खूप बोलत असते
घमघमणारा सुगंध तिचा मात्र केवळ रातीचा
फूल कोणतंही असू दे मित्रा, फूलाला सुगंध मातीचा ..
छोट्या देवघरासमोर निरांजन तेवत असते
प्रसन्न अशा घरामध्ये अन्नपूर्णा जेवत असते
तेवणाऱ्या त्या ज्योतीला आधार जळणाऱ्या वातीचा ..
प्रत्येकाच्या भाळावरती भाग्य असतं कोरलेलं
भाग्य रेषांमधूनच आणखी दुर्भाग्यही लपलेलं
मृत्युंजय कर्णालाही शाप असतो जातीचा ..
बुद्ध आम्हा सांगून गेला आशा दु:खाचं मूळ आहे
तरी मनामध्ये का ऐहिकाचं खूळ आहे
मी माझे म्हणत बसतोस पण सारा खेळ नियतीचा ..

No comments:

Post a Comment