NiKi

NiKi

Tuesday, May 1, 2012



सुगंध मनातला

मनातील अंतरातला

अंतरातील भावनेतला

सुगंध कुसुमातला

कुसुमातिल गाभ्यातला

गाभ्यातिल मधातला

सुगंध मातीतला

मातीमधल्या ओलाव्यातला

ओलाव्यातिल धुन्दितला

सुगंध आसमंतातला

आसमंतातिल मेघातला

मेघामधुन बरस्नार्या धारान्तला

सुगंध पाव्यातला

पाव्यातिल सुरातला

सुरामधिल मधुर गाण्यातला

सुगंध प्रीतितला

प्रीतिमधल्या प्रेमातला

प्रेमामधिल अमरत्वातला

सुगंध तुझ्या नी माझ्या मैत्रितला

मैत्रिमधल्या रेशीम धाग्यातला

आणि त्या धाग्यामधिल विश्वासातला

No comments:

Post a Comment