राधा म्हणजे प्रेम...
राधा म्हणजे परम भक्ती..
.राधा म्हणजे निरामय आणि निरपेक्ष प्रेम
राधा म्हणजे उत्कटता आणि राधा म्हणजेच सात्विकता !!
राधेने कॄष्णावर अमर्याद प्रेम केलं. त्या प्रेमाचे, त्या भक्तीचे गोडवे आजही गायले जातात. आयुष्यात असं राधेसारखं प्रेम आपल्यालाही करता यावं, ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते...स्वत:तल्या राधेचा प्रत्येकीचा शोध कायम असतो. नेहमीच आयुष्यात कुठलेतरी रंग सापडतात आणि कुठलेतरी हरवतात. स्वत:तल्या हरवलेल्या रंगाचा शोध प्रत्येक राधा घेत असते...या हरवलेल्या रंगाचा, प्रेमाचा शोध घेताना अख्ख्या जगाशी दावा मांडावा लागतो...पण तो दावा मांडला तरी आपल्या कॄष्णावर तिला खरंच हक्क गाजवता येतो ? पण राधेला कुणावरही हक्क नकोय, कुठलेही अधिकार नकोयत. तिला हवंय निरलस निरागस आणि निस्सीम प्रेम.

No comments:
Post a Comment