NiKi

NiKi

Monday, June 10, 2013

तुझ्या जवळ खूप जवळ
असावसं वाटतंय..
ओंजळीत तुझ्या अलगत येऊन
मिटावसं वाटतंय..

केसांतून तुझ्या हळुवार बोट,
लहारावस वाटतंय..
माझ्या ओठांवर तुझे शब्द.
गावसं वाटतंय..

क्षीण झालेला अश्रू
बिचारा उगीच कान्हतोय..
मनातील मऊ स्पर्श..
माझामध्ये रमतोय..

माझा अळसही हलके हसून
तू झेलावा वाटतंय..
क्षण जादू भरे सुगंधी व्हावे
सुगंधालाही वाटतंय...

आपल्यामधल निष्टुर अंतर
कमी व्हाव वाटतंय..
चौकटीच्या परीघावारती
तूच असावी वाटतंय..

No comments:

Post a Comment