NiKi

NiKi

Monday, June 10, 2013

तू बरोबर असतेस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं,
दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,
नाहीतर खिडकीतूनच,
पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!

No comments:

Post a Comment