NiKi

NiKi

Monday, June 3, 2013


मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल
... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी
... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ...
पण तिला नेहमी आनंदात ठेव,

माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल

. पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,

का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,
का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,

मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "




No comments:

Post a Comment