NiKi

NiKi

Tuesday, June 4, 2013

माझी प्रेयसी

काय सांगू कशी आहे ती
शब्दच कमी पडतील तिला शब्दात
मांडायला...

तिचा तो तेजस्वी निरागस
चेहरा ज्याच्या तेजाने सुर्यालाही लाज
वाटेल ....

तिचे ते गोंडस रुप
तिला पाहून चंद्रमाही आकाशात लपेल....

तिचा स्वभाव,
जणू एखाद्या निश्पाप आणि चंचल
चिमुरड्यासारखा ज्याला कशाचीच
काळजी नसते फक्त हसत-खेळत रहाणे एवढेच
माहित असते...

कितीही नटखट आणि खट्याळ
असली तरीही ती समजुतदार पणाने
स्वत:ला सावरणारी अशीच आहे माझी"ती"

जिच्यावर माझ्यापेक्षाही जिवापाड प्रेम
करतो नेहमीच तिच्या आठवणीत
गुंततो
तिच्याशिवाय
मला आयुष्याची कल्पनाही करवत नाही

No comments:

Post a Comment