फक्त तुझ्या डोळ्यांनी
काय जादू केली
हरवलेली माझी दृष्टी
क्षणात जागी झाली
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
मनावर फुंकर घातली
भडकत असलेली आग
क्षणात शांत झाली
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
जगण्याची इच्छा जागवली
क्षणात झालेली ओळखी
आज जिवंत झाली
फक्त तुझ्या डोळ्यांनी
आत्मविश्वासाला जागा दिली
काळोखी रात्र सुद्धा
सोबतीला धावून आली
फक्त तुझ्या डोळ्यांनी
अश्रुंनाच जागा दिली
No comments:
Post a Comment