NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013

जीवनाच्या धूंद स्मृति
क्षणांत मनीं उभरतात
अन हृदयांतील मंद मंद
श्वास क्षणभर अडखळतात

ठेवले तुला जतन करोनि
मम पापण्यांच्या पंखांत
कोरून तशीच ठेविली
तव रूपरेखा हृदयांत

सदैव तूं वास करतो
हृदयाच्या स्पंदनांत
नेत्रांतील मूर्ती तुझी
हळूच येते स्वप्नांत

तुला पाहते सदैव मी
जागेपणी वा स्वप्नांत
आधारावर त्याच एका
जीवन जगते एकांतात

No comments:

Post a Comment