NiKi

NiKi

Friday, June 28, 2013

तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे
कधी ते डाव मांडावे
कधी हसून मोडावे
तिच्या रुसव्यात शब्दांचे
दुहेरी बोलणे व्हावे
किती मोजू तऱ्हा आता
तिच्या त्या वार करण्याच्या
तिच्या हाती कट्यारीने
सुखाचे खेळणे व्हावे
तिच्या डोळ्यातले पक्षी
फुलांचे सोबती होते
किती दारंग स्वप्नांचे
निजेवर सांडणे व्हावे ..
तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे .. ♥♥

No comments:

Post a Comment