स्वप्ने माझी तुझ्यापासून
आठवणी हि मिळाल्या तुझ्या पासून
तू तर दूर आहेस माझ्यापासून
पण नाही वेगळा हृदयापासून..
रेशीम गाठी जन्मोजन्मीच्या
जुळल्या दोन मनांच्या
तोड नाही त्याला कशाची
भीती कशाला जगाची...
असाच एकदा येउनी जा,
हाल मनीचे कळवूनी जा
स्वप्ने जी पाहतेय मी,
सत्यात ती उतरवुनी जा..
हाल वेड्या मनाचे,
कळतील का रे तुला?
कधी हळुवार पणे अचानक,
मिठीत घेशील का रे मला?
ध्यानी मनी तूच माझ्या,
प्रत्येक श्वासातही तूच,
वेडी माझी प्रीत सख्या रे..
येउनी कधी पाहशील का?
~

No comments:
Post a Comment