एक ओंजळ भरुनी
मागावे काही वाटले;
हात हातात घेवूनी
थोडे चालावे वाटले;
न्हावून तुझ्या प्रीतीत
रंगुनी जावे वाटले;
मिठीत या तुझ्या
असेच हरवावे वाटले;
हळव्या या डोळ्यात
रूप हे तुझे दाटले;
पाहताच तुला रोज
डोळे खुदकन हसले;
बंध हे रेशमाचे
असेच मी जपले;
मनाच्या पटलावरती
कोरून मी ठेवले;
सारेच हे क्षण
मोहक मला भासले;
भरुनी ओंजळीत जरा
जपून ठेवावे वाटले;
मागावे काही वाटले;
हात हातात घेवूनी
थोडे चालावे वाटले;
न्हावून तुझ्या प्रीतीत
रंगुनी जावे वाटले;
मिठीत या तुझ्या
असेच हरवावे वाटले;
हळव्या या डोळ्यात
रूप हे तुझे दाटले;
पाहताच तुला रोज
डोळे खुदकन हसले;
बंध हे रेशमाचे
असेच मी जपले;
मनाच्या पटलावरती
कोरून मी ठेवले;
सारेच हे क्षण
मोहक मला भासले;
भरुनी ओंजळीत जरा
जपून ठेवावे वाटले;
No comments:
Post a Comment