" तुझी आठवण "
आज सकाळी अचानक उचकी लागली
आणि एकदम तुझी आठवण आली
डोळे पाणावले, मनात कळ दाटून आली
ए हे तुझं बरं नाही बघ
सारखं आठवणीत येऊन मला सतावण
आणि बघ ना, मला पण जमत नाही तुझ्यावर रागावणं
सावली बनून तू सतत माझ्या पाठीशी असते
रक्त बनून माझ्या नसा - नसात वाहते
कायमच तुझं माझ्या मनात वास्तव्य असतं
कायम माझं मन तुझ्याच आत्म्यात वसत
कारण माझ आणि तुझं अस्तित्व तसं वेगळं नाहीच
दोन शरीरात वावरणारा आपला एकंच जीव आहे
तुझ्या हृदयाचे ठोके मला माझ्या काळजात जाणवतात
श्वास तुझे माझ्या श्वासांना सुगंधित करतात
तू जेव्हा हसतेस, ओठांवर माझ्या हसू फुलतं
तू जेव्हा रडतेस, मन माझं उदास होतं
सांग मला, हि आपली कुठल्या जन्मीची ओढ आहे
प्रेमात तुझ्या जीवनात या फुलला मोगऱ्याचा पाट आहे
आयुष्य माझं तुझ्या विना अपूर्ण आहे
आता सांग, माझ्या प्रेमात काय कमी राहिलं?
आठवणीत माझ्या येऊन तुझ मला का सतावण असतं?
ए नको ग अशी वागू, माझ्या मनाला नको ग अशी छळू
कळतं ग मला, तुझ माझ्यावरच निस्सीम प्रेम
म्हणूनच मी पण तुझ्या प्रेमाच्या कसोटीवर
खरा उतरण्याचा प्रयत्न करतोय
आणि म्हणूनच आठवणींना तुझ्या , मी कवेत घेऊन जगतो आहे .....

No comments:
Post a Comment