एकदा वाटलं पाऊस होऊन बघावं
अन तुझ्या अंगणात बरसावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
पाऊस गेल्यावर तू अंगणातून बाजूला का सरावं...?
पुन्हा वाटलं ऊन होऊन बघावं
त्या सोनेरी किरणांनी तुला न्हाऊ घालावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
त्याच्याकडे पाहून तू डोळ्याला का झाकावं.....?
पुन्हा वाटलं चंद्र होऊन बघावं
तुझ्या खिडकीत येऊन तुला पहावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
त्याच्याकडे पाहून तू झोपी का जावं.....?
शेवटी मनानं म्हटलं.....
एकदा स्वत: तुझ्यासमोर यावं
अन त्या क्षणी तू फक्त
मला अन मलाच पहावं.....♥♥♥

No comments:
Post a Comment