NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013

वाटलं होतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!
वळणा-वळणावर थांबलेल्या
जीवनाचा,  तू एक प्रवाह असशील!
विस्कटलेल्या त्या प्रत्येक नात्याचं
तू एक संकुल बनवशील!
मला कधीही न कळलेल्या
त्या प्रेमाची;
तू परिभाषा असशील!
निरर्थक, नाउमेद जगण्यास माझ्या
तू एक श्वास ठरशील!

पण वाटलं नव्हत
माझं अख्खं भावविश्वच तू
तुझ्या तळहातावर अलगद पेलशील!
मनाच्या गाभाऱ्यात माझ्या
तू एक प्रेमांकुर पेरशील!
अन वाळवंटी आयुष्यात माझ्या
तू दोन गुलाब उगवशील!
रुक्ष जीवनाचं माझ्या
तू नंदनवन करशील!

वाटलं नव्हतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!

No comments:

Post a Comment