मन असतं त्या फुलपाखरा सारखं...
स्वभावाच्या रंगांनी भरलेलं.....चंचल.....नेहमी कसल्या न कसल्या तरी शोधात भटकणारं....
ह्या मनाचा नक्की कोणता रंग कुणाला, का आणि किती वेळासाठी आवडेल हे भाकीत न मांडता येण्यासारखं असतं.
मन असतं कधी कधी त्या आकाशासारखं......
एकदम निरभ्र....सोबत दुसरं कुणीही नको हवं असणारं...
स्वत: सोबतच खूप खुष असणारं....
कधी कधी स्वतःचाच एखादा रंग नव्याने सापडला म्हणून आश्चर्याने फुललेलं.....
तर कधी स्वतःचाच एखादा रंग स्वतःलाच सापडत नाही,बहुतेक तो रंग हरवला म्हणून गोंधळलेलं.....
मन असतं त्या आकाशातल्या चंद्रासारखं......
कधी चांदण्यांनी वेढलेलं, कधी आठवणींनी छेडलेलं....
कधी कुणाला तरी वेड लावणारं...कधी कुणाचं तरी वेड घेणारं....
डाग असूनही कुणाच्या ना कुणाच्या आवडीत शामिल झालेलं....
कधी ग्रहणात अडकणारं....कधी पौर्णिमेत लख्ख प्रसन्न चमकणारं....
स्वतःच्या रंगांनी सागराच्या कोणत्या कोणत्या लाटेला भरती आणणारं....
आठवणीचा भुंगा कानामागे सतत भुंगत असतो....अस्तित्वाची जाणींव करून द्यायला.....
झाडांच्या पानांमधून सूर्यकिरणांच्या छोट्या छोट्या भेटी आपल्या पदरात येतात.....ओंझळ भरते.
मनाची ओंझळ कधीच भरत नाही...ती तशीच राहते....भरूनही रिकामी....
थोडं अजून हवं होतं.....आणि......अजून थोडंसं हवं होतं

No comments:
Post a Comment