NiKi

NiKi

Tuesday, June 18, 2013


एक क्षण पुरे..... .

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला!

एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला!

एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला!

एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला!



No comments:

Post a Comment