मेघ सावळा बरसून गेला
आठवणी या जाग्या झाल्या
अजूनही स्मरती क्षण ते ओले
तुझ्याच संगे घालविलेले
पुन्हा कधी जरी तू ना दिसला
स्मृती आपुल्या कोरून गेला
मेघ बरसता वेली भिजल्या
शहारून त्या कंपित झाल्या
आधारास्तव शोधू लागल्या
अपुल्या अपुल्या प्रिय सखयाला
निसर्ग दृश्य हे डोळ्यापुढती
आठवणींचा गोफ उकलती
तुझ्यामुळे रे मेघा मजला
गतकाळाचा पट सापडला
हवाहवासा जो वाटत होता
आठवणी या जाग्या झाल्या
अजूनही स्मरती क्षण ते ओले
तुझ्याच संगे घालविलेले
पुन्हा कधी जरी तू ना दिसला
स्मृती आपुल्या कोरून गेला
मेघ बरसता वेली भिजल्या
शहारून त्या कंपित झाल्या
आधारास्तव शोधू लागल्या
अपुल्या अपुल्या प्रिय सखयाला
निसर्ग दृश्य हे डोळ्यापुढती
आठवणींचा गोफ उकलती
तुझ्यामुळे रे मेघा मजला
गतकाळाचा पट सापडला
हवाहवासा जो वाटत होता
No comments:
Post a Comment