लाडात आलेला चेहरा
तुझ्या मनातले भाव
मला सांगून जातो
लाडात आलेला चेहरा
माझ्या मनातही
तुझा मोह जागवतो
तेव्हा त्या नजरेत
दिसते ओसंडून वहाणारी
प्रीत फक्त प्रीत
माझ्या मनातही तेव्हा
तू जागवतेस
प्रितीचे मधुर गीत
ती नशीली नजर पाहून
माझ्याही नकळत
मी तुझा होऊन जातो
लाडात आलेला चेहरा
तू अबोल राहूनही
तुझ्यावर प्रीत उधळायला लावतो .
No comments:
Post a Comment