NiKi

NiKi

Tuesday, June 25, 2013


"तुझ्या डोळ्यांत कसं आज चांदण हसती...
जसा चंद्र करतो रोज ढगांत मसती ....."

"तुझ्या हाती चांदण...तुझे हात चांदण्याचे....
आज चंद्र वाट पाही तुझे हात लागण्याचे..."

"बघे रोखून नजर तुला... चंद्र हा मुजोर...
झुरे हातातलं बघून तुझ्या.. चांदण बिल्लोर..."

"भिजे चांदण्याची वाट.. कसा पडला पाऊस...?
सखा तुझा चंद्र आहे ...त्याचे घर तुलाच ठाऊक...!!"

"जसा पदर ढळतो ना... तशी तू रात्र हि ढळू दे...
आज माझ्यासकट चांदण्यांची रात्र हि जळू दे...!!!"

"आज चांदण्यांचा बघ कुणी शिंपिला हा सडा...!!
तुझ्या वाटेत जणू ...कुणी चंद्रच उधडला...."

"आज..चंद्र..चांदण्या...आणि तुझी हि सोबत...!
आज कळले मला..निळ्या नभाचे गुपित....!!!

"आज अल्याड चांदण....आज पल्याड चांदण....
आज चंद्र आहे चोर...त्याच्या मनात चांदण..."




No comments:

Post a Comment