NiKi

NiKi

Monday, June 24, 2013

नेहमी वाटत मला ,
मी काहीतरी चूक करावी ,
आणि तुझ्याकडून मला प्रेमळ
शिक्षा मिळावी ....
झालेल्या जखमेवर माझ्या,
तुझ्याच मायेची फुंकर असावी ......
केलेल्या माझ्या हट्टाना ,
तूच पुरवण्याची आस असावी ...........
असेल दु:खात तेव्हा ,
तुझ्याच सोबतीची जोड असावी .. ......
न बोलता माझ्या वेदना ,
कधी तुही समजून जाव्या......
तोल जाता माझा ,
सावरणारे हात तुझेच असावे ..........
माझ्या आठवणीत एकांतपणी,
कधी तुही रमावं.......... ..
मैत्रीच्या पलीकडे कधीतरी,
तुही काही बोलावं ...............
आजहि मला ,
या अपेक्षांचा भास होतो
आणि न कळत तू त्या नेहमीप्रमाणे
मोडतो ........

No comments:

Post a Comment