NiKi

NiKi

Monday, June 10, 2013

मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

ते एकमेकांत हरवून जाण एकमेकांना फुलासारखं जपण...
रेशमी बंधांना पुन्हा एकदा विणावंस वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझा पहिला वहीला स्पर्श...
तुला पाहून लपवता न आलेला हर्ष...
सगळ सगळा पुन्हा अनुभावावसे वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं..
जोषात येऊन तू मला चांदणं तोडून देणं..
स्वप्नांच्या त्या विश्वात मला पुन्हा जगावंस वाटतंय..
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझं मला वेडू म्हणून हाक मारण..
मी चिडले की तुझं खोटा खोटा हसणं..
तूझे माझ्या वरचे प्रेम,पुन्हा एकदा अनुभवास वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय..

No comments:

Post a Comment