NiKi

NiKi

Friday, June 14, 2013

" आठवण तुझी "



हृदयाच्या कुठल्यातरी कप्प्यात
सुगंधी फुलाप्रमाणे
दरवळणार्या असतात तुझ्या आठवणी . . .

पावसाच्या पहिल्या सरींनी
अंग न अंग रोमांचित झालेल्या
धरणीप्रमाणे असतात तुझ्या आठवणी.. .

नुकत्याच न्हाऊन निघालेल्या
तरुणीच्या नखशिखांत रसरसणाऱ्या
सौंदर्या प्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

रणरणत्या उन्हात फिरताना
एखाद्या ढगाने अचानक तुमच्यावर
धरलेल्या सावलीप्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

उगाचच झालेल्या जखमेत
ठसठसणाऱ्या वेदनेप्रमाणे
असतात तुझ्या आठवणी . . .

शांतपणे एखाद्या कुठल्या कोपऱ्यात बसल्यावर
उगाचच डोळ्यात
भरून येत असतात तुझ्या आठवणी . . .

हळव्या प्रेमाच्या कबुलीची शाई वाळायच्या अगोदरच
प्रेमपत्राला कुणीतरी आग लावावी,
अन,
त्याने अंगाची लाही लाही व्हावी
धुमसणाऱ्या मनाच्या धगधगत्या
ज्वालांसारख्या असतात तुझ्या आठवणी . . .

अत्तराच्या दरवळणार्या गंधाप्रमाणे
मनाच्या कुपीत आयुष्यभर जपून ठेवाव्यात
अशा तुझ्या आठवणी . . .

पानझडी ने मरणप्राय झालेल्या झाडाला
श्रावण सरींनी दरदरून पालवी फुटावी
अन त्याचे अंग न अंग रोमांचित व्हावे
अशा जीवनदायी सरी प्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

तू आणि तुझ्या आठवणींशिवाय
हल्ली मला काही सुचत नाही
खूप काही करावासा वाटत
पण मन मात्र रमत नाही . . . . . .

No comments:

Post a Comment