NiKi

NiKi

Friday, June 14, 2013

एक मैत्रीण


एका मैत्रिणीच आयुष्यात काय महत्व असतं
हे तेव्हा समजलं
जेव्हा तिचं माझ्या आयुष्यात येणं झालं
आजच्या फास्ट communication च्या जगात आमची ओळख झाली
बघता बघता तिची माझ्याशी, माझी तिच्याशी चांगलीच गट्टी जमली
कुणाशी नातं बनवायला आधीची ओळख जरुरी असते???
तर नातं घडवण्याची जिद्द तुमच्या मनगटी असावी लागते
एका कोवळ्या रोपट्या प्रमाणे नात्याला जपावं लागतं
आपुलकीची उब देऊन त्याला वाढवावं लागतं
पण एकदा का त्याची मुळे खोल रुजली कि
तेच रोपटं झाड बनून तुमच्या हयातभर
तुम्हाला सावली देतं

सालस , सुंदर, सुसंस्कृत सभ्य
आपल्या तेजानी मला लाखाखी देणारी .....
तिचं हास्य, सुंदर हसरी पहाट जणू
तिचे डोळे, भावनांचे सप्तरंगी इंद्रधनू
मला समजावणारी आणि वेळ पडली तर समजणारी
धीरोदात्त बोलांनी मन शांत करणारी
आपला नातं हळुवार हातांनी जपणारी
मैत्रीपेक्षा मोठा पण, प्रेम पेक्षा कमी ची सीमा ओळखणारी
माझ्या आठवणींशी लपंडाव खेळणारी
नकळतच माझ्या मनात तिचं अस्तित्व जागवणारी
लाजरी बुजरी शांत आणि निःस्वार्थ
मला एकांतात नेहमीच जाणवतं
तिचं दरवळणार अस्तित्व
कुपीतल्या अत्तराच्या मंद सुगंधा सारखं
जाणवतोय मला तिचा माझ्यावरचा अतोनात विश्वास
आणि त्यामुळे आतल्या आत मन सुखावताय खास
मी पण तिच्या विश्वासावर
खरा उतरण्याचा प्रयत्न करतोय
पण माहिती नाही कितपत यशस्वी होईल
कारण तिच्यापुढे मी आणि माझं 'मी' पण
सर्व काही शून्य असतं

खरच तिच्यामुळे नात्यांवर विश्वास आहे
मनात जगण्याची उमेद आहे
प्रेम, विश्वास, त्याग, धैर्य, निष्ठा
यांची ती मूर्तिमंत प्रतिक आहे

खरच आयुष्यात एक खरी खुरी मैत्रीण असणं
अतिशय गरजेचं असतं
आणि तिची किती गरज आहे
हे, ज्याच्या आयुष्यात ती आहे
फक्त त्यालाच कळत असतं .....................

No comments:

Post a Comment