NiKi

NiKi

Tuesday, June 25, 2013




तुझ्या आठवणी मी खूप जपून ठेवणार आहे
कारण, तुझ्या बाबतीत
मी फारच हळूवार भावनांत गुंतलो आहे

आपल्या मैत्रीचे भावबंध,
आयुष्यभर टिकावेत अशी आपली इच्छा होती
पण, सर्वच इच्छा पूर्ण होण्यासाठी नसतात
परिस्थिती,
खरंच, कधी कधी खूप घात करते ती,
आपल्या भावनांचा, आपल्या अपेक्षांचा, आपल्या स्वप्नांचा

भावनांना सावरणं, हे तर तूच मला शिकवलंस
इतरांबाबत मी तर माझ्या भावना सावरल्या
पण तुझ्याच बाबतीत मी त्यांना कसा सावरु?

तरीदेखील मी माझ्या भावनांना सावरणार आहे
कारण मी त्यांना सावरलं नाही तर तो
तुझ्या-माझ्या मैत्रीचा अपमान होईल

एकमेकांना समजून घेणं, हाच
आपल्या मैत्रीतील खरा भावबंध
एकमेकांपासून दूर राहुनही हे
भावबंध आपल्याला जपायचे आहेत
कितीही हृदय भरुन आले तरी
मला तुझ्या आठवणी जपायच्या आहेत.


No comments:

Post a Comment