NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013



तुझ्या मिठीत गारवा

तुझ्या मिठीत गारवा
धुंद फुंद हा नवा
तशात म्लान मोगरा
खुणावतो पुन्हा पुन्हा

असेच मत्त चांदणे
सुखावते तनामना
सतार वाजते जशी
मधुर नाद किणकिणा

नकोस जाऊ ना सखे
पहाट अजून व्हायची
अजून माधुरी तुझी
आकंठुनी प्यायची

तृप्त तृप्त आज मी
तरल सुखदवेदना
उमटू दे पुन्हा तना
तोच दंश त्या खुणा

No comments:

Post a Comment