NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013

ओठांत तुझ्या
वेडे शब्दही चिंब झाले
रहस्य मनातले मग ते
गुपचूप कानात सांगून गेले

रात्र सुद्धा बिचारी
तुझ्या डोळ्यात हरवली
चंद्राची चांदणी
मग दिवसा उगवली

वादळातला वारा  भरकटला
तुझ्या केसामध्ये जाऊन गुंतला 
सगळीकडे गोंधळ उडाला
वारा मात्र केसाच्या बटेबरोबर खेळत बसला

कपाळावरच्या बिंदीला
सूर्य भाळला
रोज आकाशात उगवणारा तो
आज मात्र तुझ्या भाळी उमटला

कमानदार तुझ्या कमरेखाली
इंद्रधनुष्य लाजला
सुटला तीर अन
काळजाला आरपार घुसला..

No comments:

Post a Comment