NiKi

NiKi

Monday, June 10, 2013

नजरेतल प्रेम
तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत!

तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं
तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं!

तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं
तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं!

तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत
तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं!

जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं!

No comments:

Post a Comment