NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013



तुझ्या गंधान
रोम रोम भारलेल असतं
प्रत्येक क्षणात माझं मन
तुझ्या प्रीत गंधान
मोहरलेल असतं
तू वावरत असतोस माझ्यात
अगदी जागे झाल्यापासून
निद्रिस्त होईपर्यंत
खरं म्हणजे अजूनही
विश्वास बसत नाही माझ्यावर
हे असंही घडू शकत आयुष्यात
पण तू आलासच असा
एक वादळ होऊन प्रेमाचं
कि जे मी कधी स्वप्नातही
विचार करू शकत नव्हते
कधी वाटलंच नव्हत असंही प्रेम
कुणी करू शकत कुणावर
निष्पाप अन निरागस
कुठलीही अपेक्षा न बाळगणार
म्हणून अजूनही हे स्वप्नच वाटतं
पण तुझ्यामुळेच कळला मला
खऱ्या प्रेमाचा अर्थ
अन प्रेमात बेधुंद जगणं
काय असतं ते हि
तूच जगणं झालायं
तूच जगणं झालायं .

No comments:

Post a Comment