एक स्वप्न आहे
तुला खळखळून हसताना पाहणार
तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू
बनून गालावर वाहणार....
एक स्वप्न आहे
तुला हळुवार कवेत घेणार
सोबतीने तुझ्या मला
प्रीतीत चिंब भिजवणार....
एक स्वप्न आहे
तुझ्या भविष्यात हरवणार
तू दूर असताना मात्र
आयुष्य शून्य जाणवणार....
एक स्वप्न आहे
तूच सार जीवन बनून
संगतीने तुझ्या जगणार
तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं
एक स्वप्न आहे.....

No comments:
Post a Comment