" प्रतीक्षा तुझी "
तनामनाला वेधून टाकणारी
अवघ्या जीवनाला व्यापून उरलेली
तुझ्या येण्याची प्रतीक्षा
तुझ्या थरथरत्या स्पर्शाचा आठव
माझ्या सर्वांगाला वेधून घेणारा स्पर्श
अंगाअंगातून ठिणग्या फुलवीत जाणारा
शरीरभर उसळणाऱ्या लाटा
एका मागून येत आदळत राहतात
मागणीच्या लाटा..... तृप्तीच्या किनाऱ्यावर
एक लाट अतृप्ततेची परत जाणारी
पुन्हा मागणीचा वेग घेऊन येण्यासाठी
प्रत्येक अणुरेणु जागा होतो
धाऊ लागतो बेलगाम
शोधू लागतो तुला
खूप खूप हवा आहे
असह्य होऊन जातो विरह
वाटतं तिने यावं.... सर्व शांत शांत करावं

No comments:
Post a Comment